जाणीव

 ऐक ना...

 तु नसूनही असतोस सतत

 विचारात माझ्या...

 हळूहळू गुंतत चालले मी प्रेमात तुझ्या...

 तु ...तुझी सोबत आणि स्पर्श तुझा 

 कधी एकांतात तर कधी गर्दीतही जाणवतो...

 कधी कधी तुझ्या हावभावातून तु 

 तु माझाच असल्याचे खुणावतो...

 आता हा भास माझा की भावना तुझ्या मनातली 

 हावभावातून दिसणारी...

 काही क्षणाचे का असेना पण 

 या वेड्या मनाला सहानुभूती देणारी...

 वाटतं तुला सांगावं सगळं 

 पण मनाला भीती तुझ्या दूर जाण्याची...

 मग लगेच जाणीव होते वास्तवाची 

 तु फक्त त्या वस्तावातले एक स्वप्न असल्याची...

 मी तुझीच पण तु माझा नसल्याची!

Comments

Popular posts from this blog

जिंदगी एक तोफा

भेटली पुन्हा मीच मला...