भेटली पुन्हा मीच मला...
का गेली होतीस मला सोडून ?
मैत्रीचं अस घट्ट नातं जाते का कोणी तोडून ?
आज तुला पाहून मन माझं भरून आलं...
थोडीच रडली पण मन मात्र मोकळं झालं..
एक सांगू का तुला ?
विसरली होती गं मी माझं अस्तित्व....
या जगाच्या जगरीतेत जगतांना...
विसरली होती स्वतःला...
रडायची प्रत्येक नाती जपतांना..
इथे ना एका गैरसजावरून अक्षरशः नात तुटतं....
मग त्या व्यक्तीसाठी मन आयुष्यभर झुरतं...
इथे एका क्षणाच सुख जरी पाहिजे असेल ना ,
तर मनाशी आधीच ठरवावं लागत की यानंतर दुःखच मिळेल...
पण या क्षणीक सुखासाठी मी हे दुःखही गिळेल...
इथे खुप नाती जुळतात,
पण खरी वेळ आल्यावर कळते की कोण आपली असतात...
इथे चुकतो आपणच , अपेक्षा ठेवतो न अपल्यांपासून....
पण मी तेही सोडलंय आता...
मला माझं पाहिजे , कोणीतरी हक्काचं...
आणि तू आहेस ना ! एवढे अनुभव आलेत की अंधारही आवडायला लागलाय गं मला...
पण एक मात्र सांगते हं तुला ....
की एवढं असूनही खूप खुश आहे मी...
करण तू भेटली मला
काहीही असो ...
भेटली पुन्हा मीच मला....
Comments
Post a Comment