प्रेम...
कसं असतं हे प्रेम...
कदाचीत सोबत नसतांनाही त्यांच्या असण्याचा भास..
माहित आहे आपण कधी एकत्र येणार नाही,
पण तरीही त्याच व्यक्तीला पाहण्याची आस....
कधी रुसणं , कधी हसणं...
कधी अबोला धरणं तर कधी मनसोक्त बोलणं...
मला नाही माहित नेमकं कस असतं...
पण एखाद्यासाठी time pass
तर एखाद्याला जगण्यासाठी मिळालेलं कारण असतं..
एखाद्याला मरणाच्या दारातून बाहेर काढून जगणं शिकवतं
तर एखादा याच्या दुःखात जगणंच विसरतो....
पण याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन मात्र व्यक्तिपरत्वे बदलत जातो....
Comments
Post a Comment