मैत्रीचं की प्रेमाचं ???
मैत्रीचं की प्रेमाचं नातं तुझं माझं ?
तू असलास समजावयाला तर रुसायलाही आवडतं..
तू असलास तर दुःखातहि हसायला आवडतं...
जेव्हा केव्हाही आठवते तुझ्या सोबत घालवलेले क्षण,
तेव्हा तुझ्यासोबत बोलण्यासाठी झुरते माझं मन...
तुझा अबोलाही जीवघेणा वाटतो रे मला ....
कधी कधी वाटते विचारावं तुला,
आपलं म्हणून कधी आठवतोस का मला??
आज जर कधी तुझी आठवण आली ना
तर चेहऱ्यावर हास्य आणि मनात दुःख असतं...
जाणीव होते तू माझ्याजवळ नसण्याची,
तर कधी दूर असूनही जवळ असण्याची...
खूप वाईट वाटते रे...
पण मग तरीही का माझं मन सतत तुझ्याच कडे वळते?
का तुझी सोबत हवीहवीशी वाटते?
नातं मात्र खूप पवित्र आहे हं आपलं !
यात ना कुठला लोभ आहे नाही कशाची हाव...
कधी कधी कळतच नाही काय द्यावं याला नाव..
तू सांगशील का मला ?
हे मैत्रीचं की प्रेमाचं नातं तुझं माझं????
Comments
Post a Comment