Posts

जाणीव

 ऐक ना...  तु नसूनही असतोस सतत  विचारात माझ्या...  हळूहळू गुंतत चालले मी प्रेमात तुझ्या...  तु ...तुझी सोबत आणि स्पर्श तुझा   कधी एकांतात तर कधी गर्दीतही जाणवतो...  कधी कधी तुझ्या हावभावातून तु   तु माझाच असल्याचे खुणावतो...  आता हा भास माझा की भावना तुझ्या मनातली   हावभावातून दिसणारी...  काही क्षणाचे का असेना पण   या वेड्या मनाला सहानुभूती देणारी...  वाटतं तुला सांगावं सगळं   पण मनाला भीती तुझ्या दूर जाण्याची...  मग लगेच जाणीव होते वास्तवाची   तु फक्त त्या वस्तावातले एक स्वप्न असल्याची...  मी तुझीच पण तु माझा नसल्याची!

भेटली पुन्हा मीच मला...

का गेली होतीस मला सोडून ? मैत्रीचं अस घट्ट नातं जाते का कोणी तोडून ? आज तुला पाहून मन माझं भरून आलं... थोडीच रडली पण मन मात्र मोकळं झालं..  एक सांगू का तुला ?  विसरली होती गं मी माझं अस्तित्व....  या जगाच्या जगरीतेत जगतांना...  विसरली होती स्वतःला...  रडायची प्रत्येक नाती जपतांना..  इथे ना एका गैरसजावरून अक्षरशः नात तुटतं.... मग त्या व्यक्तीसाठी मन आयुष्यभर झुरतं... इथे एका क्षणाच सुख जरी पाहिजे असेल ना , तर मनाशी आधीच ठरवावं लागत की यानंतर दुःखच मिळेल... पण या क्षणीक सुखासाठी मी हे दुःखही गिळेल... इथे खुप नाती जुळतात,  पण खरी वेळ आल्यावर कळते की कोण आपली असतात... इथे चुकतो आपणच , अपेक्षा ठेवतो न अपल्यांपासून.... पण मी तेही सोडलंय आता... मला माझं पाहिजे , कोणीतरी हक्काचं... आणि तू आहेस ना ! एवढे अनुभव आलेत की अंधारही आवडायला लागलाय गं मला... पण एक मात्र सांगते हं तुला .... की एवढं असूनही खूप खुश आहे मी... करण तू भेटली मला काहीही असो ... भेटली पुन्हा मीच मला....  

जिंदगी

जिंदगी का एक और पन्ना भी हमने पढ लिया । कहा जिंदगी ने मुझसे, सिख लो अब अकेले रहना... हमने हसते हुए कहा.... चलो अब ये भी सिख लिया ।

प्रेम...

कसं असतं हे प्रेम... कदाचीत सोबत नसतांनाही त्यांच्या असण्याचा भास.. माहित आहे आपण कधी एकत्र येणार नाही,  पण तरीही त्याच व्यक्तीला पाहण्याची आस.... कधी रुसणं , कधी हसणं... कधी अबोला धरणं तर कधी मनसोक्त बोलणं... मला नाही माहित नेमकं कस असतं... पण एखाद्यासाठी time pass तर एखाद्याला जगण्यासाठी मिळालेलं कारण असतं.. एखाद्याला मरणाच्या दारातून बाहेर काढून जगणं शिकवतं  तर एखादा याच्या दुःखात जगणंच विसरतो.... पण याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन मात्र व्यक्तिपरत्वे बदलत जातो....

मैत्रीचं की प्रेमाचं ???

मैत्रीचं की प्रेमाचं नातं तुझं माझं ? तू असलास समजावयाला तर रुसायलाही आवडतं.. तू असलास तर दुःखातहि हसायला आवडतं... जेव्हा केव्हाही आठवते तुझ्या सोबत घालवलेले क्षण, तेव्हा तुझ्यासोबत बोलण्यासाठी झुरते माझं मन... तुझा अबोलाही जीवघेणा वाटतो रे मला .... कधी कधी वाटते विचारावं तुला, आपलं म्हणून कधी आठवतोस का मला?? आज जर कधी तुझी आठवण आली ना तर चेहऱ्यावर हास्य आणि मनात दुःख असतं... जाणीव होते तू माझ्याजवळ नसण्याची, तर कधी दूर असूनही जवळ असण्याची... खूप वाईट वाटते रे... पण मग तरीही का माझं मन सतत तुझ्याच कडे वळते? का तुझी सोबत हवीहवीशी वाटते? नातं मात्र खूप पवित्र आहे हं आपलं ! यात ना कुठला लोभ आहे नाही कशाची हाव... कधी कधी कळतच नाही काय द्यावं याला नाव.. तू सांगशील का मला ? हे मैत्रीचं की प्रेमाचं नातं तुझं माझं????

...

कभी कभी किस्मत को हमने यु भी आजमाया है... जब जब सोचा... की अब तो भूल ही जायेगे आपको... तब तब... आपका ही चेहरा सामने पाया है..।

जिंदगी

कुछ अजीब सी है ये जिंदगी... जो चाहा वो तो कभी पाया नहीं... और जिसे ना चाहो वो... बाहे फैलाकर आपके सामने खडा होता है।