shahid sainik
शहीदसैनिक
सांगत होती मोठ्या अभिमानन,
भरत गेला सैनिकात मले सोडून ,
मी रडत होती हंबरडा फोडून ,
अला नाही निरोप त्याचा गेला जेव्हापासून ,
म्या म्हटल "दोन वरिस झाले बाबा
माया भरत ले जाऊन ,
केव्हा येईल निरोप त्याचा ,
विचारत होती मोठ्या अभिमानान || १ | चार वरीस झाल्यावर आला त्याचा निरोप म्हणे आई हल्ला केला आमच्यावर शत्रुन म्या "म्हटल तु चांगला त हाय तो म्हणे "आई चांगली हाय भारतमाता माई म्हणजे म्या बिन चांगला हाय '' मी लोकायले सांगत होती मोठ्या अभिमानन भरत गेला सैनिकात मले सोडून || २||
पाचव्या वरिस हल्ला केला भारतावर शत्रुन ,
आला सैनिकाचा निरोप माया घरी की ,
"तुमचा भरत गेला तुम्हाला सोडुनि "
म्या म्हटल " माया पोरगा शहीद झाला ,
माया भारतमाते साठी ,
जरी म्या माया भरत ले जन्म देला ,
तरी तो या भारत मातेचाच पोरगा झाला ,
साऱ्या बाया रडत होत्या मले बी रडु येत होता
मनातले दुःख आसवांद्वारे पडत होते ,
तरी बी सांगत होती मोठ्या अभिमानन ,
भरत गेला सैनिकात मले सोडून || ३ ||
Comments
Post a Comment